उन्हाळा म्हटलं की बाहेर पडायला नको वाटतं. त्यातल्या
त्यात डोंगरवाटा तर नकोशा होतात. तसही उन्हाळ्यात काय पाहायचं डोंगरांवर, सुकलेलं गवत
की पानगळ झालेली शुष्क झाडं? घरातली मंडळी सुद्धा बाहेर पडू देत नाही, उन्हात आजारी
पडाल अशी तंबी देतात. मग काय घरातच काहीतरी उद्योग सुरु होतो, सावलीत खेळायचे जुने
खेळ शोधून काढले जातात आणि डाव मांडला जातो. पण एखादी पाणथळ जागा किंवा हिरवं गार जंगल
फिरायला काय हरकत आहे? सकाळी सकाळी लवकर उठून उन्हाच्या आधी एखादा फेरफटका मारला तरी
एखादे दोन पक्षी, एखाद छानसं फुलपाखरू किंवा सुंदर फुल तुमचं लक्ष वेधून घेऊ शकतं आणि
दिवस अगदी आनंदात जाऊ शकतो.
मागच्या वर्षीचा एप्रिल महिना मला आठवतो, असंच सकाळी लवकर आवरून सिंहगड किल्ल्याची वाट धरली होती. ऊन खूप म्हणून पायथ्याच्या जंगलात घुसलो, हिंडलो आणि दोन-तीन तासांच्या भ्रमंतीनंतर पुन्हा घरी निघालो. वाटेत येताना खडकवासला धरणाजवळ दोन तीन टपोऱ्या पांढऱ्या फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं, न राहवून गाडी बाजूला थांबवली. थोडं जवळ जाऊन पाहिलं, पण फुलांची ओळख काही पटेना. आणखी थोडं जवळ जाऊन निरीक्षणं घेतली. फुलांना छान आणि मनमोहक सुगंध होता. सकाळपासूनच्या नकोशा झालेल्या उन्हात नवीन फुलं सापडल्याने मी मनोमन सुखावलो होतो. थोडा वेळ आजूबाजूला फिरून संपूर्ण झाडाचं नीट निरीक्षण केलं, आवश्यक त्या नोंदी करून घेतल्या आणि निघालो, परतीच्या प्रवासाला! येताना संबंध रस्त्यातून डोक्यात वेगवेगळ्या शक्यतांचं काहूर! कसली फुलं असतील ही नक्की? एक ना अनेक प्रश्नांना सोबत घेऊन मी घरी परतलो.
घरी पोहोचून शोधाशोध सुरु झाली आणि शेवटी नाव सापडलं; कल्पेंद्र किंवा पांढरा असं ते नाव! कल्पनेपलीकडचं सौंदर्य आणि पांढऱ्या रंगाची टपोरी फुलं म्हणून हि नावं असावीत असं मला वाटतं आणि ती या फुलांना अगदी साजेशी आहेत. उन्हाळ्यात विशेषतः झाडांना (वृक्षांना) आणि झुडपांना फुलं लागतात. गवती वनस्पती क्वचितच फुलतात. उन्हाळ्यात माणसांना जसा उन्हाचा त्रास होतो तसाच त्रास साहजिकच प्राण्यांना, पक्षांना, फुलपाखरांना, मधमाशांना आणि इतर सजीवांना होत असणार. त्यामुळेच पक्षी किंवा इतर सजीव उन्हाच्या वेळी क्वचितच बाहेर पडताना दिसतात, शक्यतो ते सकाळी आणि संध्याकाळी जास्त प्रमाणात बाहेर पडतात. उन्हाच्या वेळी कुठेतरी शांत झाडाच्या सावलीत, घरट्यात किंवा कड्या-कपारीत विश्रांती घेतात. मग परागीभवनाच्या नैसर्गिक आणि दैवी कार्याला या सर्व सजीवांना उद्युक्त कसं करायचं? पण निसर्गात सर्व गोष्टींची सोय केलेली असते, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला असतो. उन्हाळ्यात जी फुले लागतात ती शक्यतो सुगंधी तरी असतात किंवा ती दिसायला सुंदर आणि भडक रंगांची तरी असतात, कधीकधी तर हे दोन्ही गुणधर्म एकाच फुलात दिसतात. कल्पेंद्र सुद्धा सौंदर्य आणि सुगंध हे दोन्ही गुण अंगी बाळगणारा आहे. मग साहजिकच पक्षी, कीटक, फुलपाखरे, मधमाशा वैगेरे फुलांकडे आकर्षित होतात आणि परागीभवनाचे सोपस्कार पार पडतात. असो, आपण कल्पेंद्र या वृक्षाची माहिती या लेखात आज घेऊ.
कल्पेंद्र तसा पाणथळ, तळ्याकाठचा, नदीकाठचा अथवा दलदलीच्या भागातला लहान उंचीचा वृक्ष. उंची साधारणपणे १२ ते १५ फुटांपर्यंत असते. वृक्षाचा पसारा साधारणपणे ७ ते १० फुटांपर्यंत असतो. कल्पेंद्रचे खोड कडक काळपट करड्या रंगाचे आणि साल खरखरीत असते. नवीन फुटलेल्या फांद्या गोलाकार नसून चौकोनी असतात. वृक्षाच्या सर्वांगावर आडव्या छोट्या फांद्या वाढतात आणि या छोट्या फांद्यांच्या टोकाला काट्यांच्या एक किंवा दोन जोड्या वाढतात.
काटे तीक्ष्ण असल्याने झाडावर प्राण्यांना चढण निव्वळ अशक्य होतं, यामुळं फुलांचं आणि फळांचं रक्षण आपोआप होतं. नवीन वाढलेल्या फांद्यांवर ५ ते ८ सेमी लांबीची आणि साधारणपणे ३ सेमी रुंदीची पाने लागतात. पानांची रुंदी टोकाकडे अधिक असते आणि देठाकडे ती कमी कमी होत जाते. टोकाकडचा भाग गोलाकार असल्याने ती देठाकडून पाहिल्यास फुगवलेल्या फुग्याच्या आकाराची किंवा अंडाकृती दिसतात. देठ साधारणपणे १ ते १.५ सेमी लांबीचा असतो. पानांचा रंग मंद हिरवा आणि चमकदार असून काठ एकसंध असतो. जोडणी एकमेकांच्या विरुद्ध असते, कधी कधी पाने छोट्या फांद्यांच्या टोकाला पुंजक्यांच्या स्वरूपात सुद्धा वाढतात. उन्हाळ्याच्या सुरवातीला जुनी पाने गळून टोकाला नवीन पाने येतात.
कल्पेंद्रची खरी ओळख आहे ती त्याच्या सुंदर आणि मनमोहक सुगंधासाठी. एका फुलोऱ्यात एक ते तीन फुलं असतात. फुलांचा रंग शुभ्र पांढरा असतो आणि उन्हात तो आणखी चमकदार होतो. फुलं टपोरी म्हणजे साधारणपणे २-३ सेमी व्यासाची असतात. यामध्ये पाच पाकळ्यांची संरक्षण दले, पाच पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, पाच पुंकेसर आणि एका स्रिकेसराचा समावेश असतो. पाकळी गोलाकार असून ती बाजूच्या पाकळीच्या काठावर पसरलेली (Overlap) असते. दोन पाकळ्यांच्या मध्ये आणि तळाला पुंकेसर वाढतो. परिपक्व झाल्यावर तो पाकळ्यांच्या बाजूला बाहेरून नागमोडी वळतो आणि त्यांचा रंग काहीसा तांबूस किंवा खाकी होतो. त्यातून पुढे परागकण बाहेर पडतात. पुंकेसरांच्या मधोमध पिवळ्या किंवा केशरी रंगाचा स्रिकेसर येतो, तो परिपक्व झाला की टोकाला दोन दलांत विभागला जातो. स्रिकेसर आणि पुंकेसराचे दांडे खूप लहान अगदी न दिसणारे असतात. संपूर्ण स्रिकेसर किंवा पुंकेसर फार तर अर्धा सामी लांबीचे असतात. फुलांचा रंग मध्यभागी काहीसा हिरवा असतो, त्यामुळे परागीभवनासाठी येणारे पक्षी, कीटक, मधमाशा किंवा फुलपाखरं योग्य ठिकाणाकडे आकर्षित होतात, एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर बसणं-उठणं होतं आणि परागीभवनाची प्रक्रिया पार पडते. सह्याद्रीतील खट्याळ वारादेखील या निसर्गकार्यात सहभागी असतो. पुढे निसर्गनियमाने फळधारणा होते, साधारणपणे ४-५ सेमी लांबीची म्हणजेच पेरूच्या किंवा चिक्कूच्या आकाराची फळे लागतात. फळे पिकून पुढे पिवळसर केशरी रंगाची होतात. फळं बेरी या प्रकारातील असून निसर्ग लहान लहान बिया आतील गरामध्ये पेरतो. पूर्ण पिकलेली फळं जमिनीवर पडतात, सडतात आणि यातील काही बिया योग्य वातावरणात रुजतात.
कल्पेंद्रला योग्य प्रमाणात पाणी असल्यास वर्षभर फुलं लागतात. त्याच्या सुंदर फुलांमुळे आणि मनमोहक सुगंधामुळे त्याची लागवड काही ठिकाणी बागेत केलेली दिसते. अर्थात या सौंदर्याचा लाभ घेताना त्यावरचे काटे विसरू नयेत. कल्पेंद्र रुबीऐसी (Rubiaceae) या कुळातील असून त्याला Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre असं शास्त्रीय नाव आहे. यातील Tamilnadia हे जातीचं नाव तामिळनाडू या नावावरून आल्यासारखं वाटतं.कल्पेंद्र हा या जातीतील एकमेव वृक्ष आहे. मराठीमध्ये याला पांढरा असही एक नाव आहे. इंग्रजीमध्ये याला Divine Jasmin नावाने ओळखतात.

Plant Profile:
Botanical Name: Tamilnadia
uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre
Synonyms: Gardenia
uliginosa, Catunaregam uliginosa, Randia uliginosa, Gardenia pomifera
Common Name: Divin
Jasmin
Marathi Name: कल्पेंद्र,
पांढरा
Family: Rubiaceae
Habit: Tree
Habitat: Near
water bodies and moist soil (पाणथळ, तळी, नदीकाठ किंवा दलदल)
Flower Colour: White
(पांढरा)
Leaves: Simple,
oblong, 5-8 cm long and 3-4 cm wide, entire margin
Smell: fragrant
Abundance: Common
near water bodies
Locality: Khadakwasala
Dam, Pune
Flowering Season: March-May
Date Captured: 10-Apr-2016
- रा.जा. डोंगरे