Flowers of Dregea volubilis |
अशीच एक वेल म्हणजे "हरणदोडी"! बहुधा डोंगररांगांवर विशेषतः उतारावर असणाऱ्या लहानशा झुडपांवर ही वाढते, त्यातल्या त्यात बाभूळ आणि खैर ही आधारासाठीची आवडती झाडे. झुडपांच्या खोडांपासून काहीसं जाड, पिवळसर करड्या रंगाचे, पिळदार, खरबरीत सालीचे खोड बाजूच्या झाडाच्या फांद्यांमध्ये घुसते, त्यांचा आधार घेऊन संपूर्ण झाडावर आपल्या वेली पसरवते. हरणदोडीची मुळे पाण्याच्या शोधत खोलवर जमिनीमध्ये जातात. नवीन फांद्या हिरवट करड्या किंवा हिरवट पिवळ्या रंगाच्या असतात. पावसाळ्यामध्ये हरणदोडीला पाने थोड्या जास्त प्रमाणात लागतात आणि उन्हाळ्यात मात्र कमी होतात, यामुळे पाण्याची बचत होते. पानांची लांबी साधारणपणे ८ ते १५ सेमी. तर रुंदी ४ ते ६ सेमी असते. रंग गडद हिरवा, स्पर्श अतिशय मुलायम असतो. पानांची रचना एकाड-एक अशा स्वरुपाची असते, देठ १.५ ते २ सेमी असतो. कड एकसंध असते. साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात वेलींवर हिरव्या किंवा काहीशी हिरवट पिवळ्या रंगाची फुले लागतात. शक्यतो एकाड-एक पानांमधून एक फुलोरा लागतो. प्रत्येक फुलोर्यात साधारणपणे १० ते १५ फुले छत्रीसारख्या अर्धगोलाकार आकारात लागतात. फुलोरे उलटे लटकले की झुंबर लावल्याचा भास होतो आणि म्हणूनच काही ठिकाणी "अंबारी" नावाने या वेलीला ओळखले जाते. फुलोर्यातील प्रत्येक फुल साधारणपणे १ सेमी व्यासाचे असते.
Habit & Habitat of Dregea volubilis |
Fruits of Dregea volubilis |
फळे पुढे परिपक्व होतात आणि त्यांचा रंग पिवळा होतो, सालीतील
पाण्याचं प्रमाण कमी होत, त्यावर सुरकुत्या
येतात,आणि फळे एका बाजूने फुटतात. पांढर्या रंगांचे केस असलेले बी यातून बाहेर येतात
आणि वार्यावर स्वार होऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. बियांचा प्रसार सोपा व्हावा
म्हणून निसर्गाने केलेली ही विशेष सोय असावी.
हरणदोडीच्या कुळाला "Milkweed Family" म्हणून
देखील ओळखल जातं, त्याच कारण असं की या वनस्पतीच्या सर्वच भागांमध्ये दुधासारखा पदार्थ
असतो. एखाद पान सहज तोडून पाहिलं तर त्याचा प्रत्येय येतो. हरणदोडीला आयुर्वेदामध्ये
खूप महत्व आहे. हरणदोडीच्या एका इंग्रजी नावामध्ये "Sneeze" असा शब्द आला
आहे, त्याचही कारण खूप गमतीशीर आहे. Sneeze चा मराठी अर्थ आहे "शिंक" आणि
हरणदोडीच्या कोवळ्या मूळांमधून स्रवणारा दुधी द्रव नाकात घातल्यास शिंका येतात आणि
म्हणून या शब्दाचा उल्लेख आढळतो.
हरणदोडीला इंग्रजी भाषेत Sneeze Wort, Cotton Milk
Plant, Green Milkweed Climber, Green Wax Flower अशा विविध नावाने ओळखले जाते तर शास्रीय
भाषेत Dregea volubilis म्हणून ओळखतात. हरणदोडी हे Asclepiadaceae या कुळामध्ये मोडते.
Seed Dispersal of Dregea volubilis |
Seed Dispersal of Dregea volubilis |
Botanical Name: Dregea volubilis (L.f.) Benth. ex Hook.f.
Synonyms: Asclepias volubilis, Dregea formosana, Wattakaka volubilis
English Name: Sneeze Wort, Cotton Milk Plant, Green Milkweed Climber, Green Wax Flower
Marathi Name: Harandodi (हरणदोडी), Nakhsikani (नखसिखणी)
Sanskrit Name: Hemjivanti (हेमजीवंती)
Family: Asclepiadaceae
Locality: Pune (Vetal Hills)
Nice info.
ReplyDeleteThank you Sandipji :)
DeleteThanks for the blog post. I have been seeing these pods but could not make out of which tree/ climber.
ReplyDeleteबाभळी, खैर यांच्या सोबत ह्या वेली आहेत आमच्या कडे. रोजच्या डोंगरफेरीत ह्या बऱ्याच डोंगर लवणात आणि झुऱयांमध्ये आढळतात.
ReplyDeleteकुठे rahatat apan sir
Deleteमाहितीबद्दल धन्यवाद मात्र याचा वापर कसा आणि कुठे करायचा याबद्दल कोणी माहिती देईल का गुडघेदुखी साठी वापरले जाते असे ऐकिवात आहेत
ReplyDeleteथँक्स 🌹👌
ReplyDeleteसासवड
ReplyDelete