रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या
आजूबाजूला खूप सारे पक्षी, फुलपाखरं, रानफुलं किंवा इतर प्राणी दिसतात. त्यांचाबद्दल
जाणून घेण्याची इच्छाही मनात खोल कुठेतरी असते, पण माहिती कुठे मिळेल हा मोठा प्रश्न
असतो. पुढे व्यस्त वेळापत्रकात हा विचार मनातल्या मनात तसाच राहून जातो. असच पुन्हा
काही दिवसांनी एखादं नवीन पाखरू आपल लक्ष वेधून घेतं आणि जुन्या आठवणी पुन्हा नव्याने
जन्म घेतात. आणखी एकदा माहिती मिळवण्याचा मनातल्या मनात संकल्प सोडला जातो! कधीकधी
माहिती मिळूनही जाते, पण तीही शास्रीय आणि बहुधा इंग्रजी भाषेत.
भारतीयांचं इंग्रजीवर प्रभुत्व
बर्यापैकी चांगलं आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतही आहे, परंतु शास्रीय इंग्रजी भाषा आणि
रोजच्या जगण्यातली इंग्रजी भाषा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. किंबहुना ही शास्रीय
भाषा सर्वसामान्य वाचकांना समजण्यापलीकडची आहे आणि वाचण्यासाठी कांटाळवाणी सुद्धा.
कंटाळवाणी यासाठी की खूप सारे शब्द शास्रीय आहेत जे रोजच्या जीवनात वापरले जात नाहीत
आणि या प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आहे, हा अर्थ लागल्याशिवाय शास्रीय वाचनात रस
निर्माण होत नाही.
या प्रश्नांना उत्तर म्हणून
'मराठी ही ज्ञानभाषा व्हावी' असं मला सतत वाटत होतं. या ब्लॉगच्या माध्यमातून सर्वसामान्य
वाचक आणि शास्रीय माहिती मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकाला शास्रीय माहिती रंजक स्वरुपात
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये सर्वांना समजेल, उमजेल आणि रुचेल अशा भाषेत
शास्रीय माहिती सोपी करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.
हा माझा पहिला प्रयत्न आहे,
चुका झाल्यास मोठ्या मनाने पदरात घ्या ही विनंती! आणि मला निसंकोच कॉमेंट मधून सांगू
शकता. तुमच्या सूचना आणि शुभेच्छा मला Contact Me पानावर असलेल्या संपर्क माध्यमांतून
करू शकता. तुम्ही याच संकेतस्थळाच्या उजव्या रकान्यातील Follow By Email चा उपयोग करून
नवीन पोस्ट साठी subscribe करू शकता.
सर्व वाचकांना धन्यवाद!
राजकुमार डोंगरे