तासभर प्रयत्न करून देखील फोटो काही मिळेना. हवेचा
जोर काहीसा जास्तच होता आज, त्यात ती फूटभर
उंचीची लहान रोपं आणि त्यावर लागलेली चिमुकली फुलं. हो चिमुकलीच, अगदी नखापेक्षाही
लहान. वर वर पाहता फुलं विशेष काही आकर्षक वाटली नाही पण रंग मात्र डोळ्यांत भरणारा.
प्रेमात पडायला भाग पाडणारा. काहीतरी वेगळं-नवीन दिसलं की पावलं पुढे जातंच नाहीत.
थांबावं वाटतं, कसली फुलं आहेत ही हे कळल्याशिवाय चैन पडत नाही. थांबलो मग, फुलं जवळून
निरखून पहिली. जवळून पाहिल्यावर फुलांचं सौंदर्य जाणवलं. नकळत डोळ्यांतून हृदयात उतरली.
निसर्ग मोठा सच्चा आणि कल्पक रंगकर्मी आहे. या लहानग्या फुलांच्या पाकळ्यांत इतके सुंदर रंग ओतले होते की जिथे लहान म्हणून दुर्लक्ष होण्यासारखी फुलंच या सुंदर रंगांमुळे प्रत्येकाला आकर्षित करत होती. अशी आकर्षक फुलं क्षणभर थांबायला लावतात, खिळवून ठेवतात. मी एक फुल बोटाच्या चिमटीत पकडलं आणि ओझरती नजर फिरवली. प्रथमदर्शनी ही "संजीवनी"च्या फुलांची कुळभगिनी असावी असं वाटलं. घरी येऊन ओळख पटवली आणि अधिक माहिती घेतली. जितकं सुंदर रूप तितकंच सुंदर नाव, शोभणारं, गुलपंखी! आधी विचार केल्याप्रमाणे ही 'संजीवनी'ची कुळभगिनीच होती.
सह्याद्रीच्या अवती-भवती असणाऱ्या माळरानांवरील नेहमीची आणि वर्षभर फुलणारी गुलपंखी विशेष कुणाच्या ओळखीची नाही. अर्थात तिचं अस्तित्व माणसाने लक्षात घ्यावं असं विशेष कदाचित नसेलही तिच्यात, पण नकळत ती मानवी फायद्याचीच आहे, विशेषकरून शेतकऱ्यांच्या! पावसाळ्यानंतर माळरानांवर हिरवं लुसलुशीत गवत उगवतं. त्यावर चराटीला गुरं सोडली जातात. गाई, म्हशी शेळ्या वैगेरे दिवसभर मनोसोक्त चरून संध्याकाळी घरी परततात. पावसाळ्यात मुबलक मिळालेला हा चारा वाढत्या दुधासाठी कारणीभूत ठरतो, हे जरी खरं असलं तरी नुसताच हिरवा चारा कारणीभूत ठरतो असं ढोबळमानाने म्हणून कसं चालेल? संजीवनी किंवा गुलपंखी सारख्या वनस्पतींचे गुणधर्म यासाठी महत्वाचे ठरतात. दुधवाढीसाठी लागणारं जैवरासयनिक सत्व या वनस्पतींना निसर्गाकडून लाभलं आहे. ही गुरं चराटीला असताना या वनस्पती खातात आणि दुधामध्ये चांगली वाढ होते. यामुळे शेतकरी मित्रांचा आर्थिक फायदा होतो.
चिमटीत पकडलेलं गुलपंखीचं फुल सोडलं आणि टिपणं घेण्यासाठी सज्ज झालो. माळावरून चालताना गुडघ्यापर्यंत लागावी एवढी उंची. फूट - दिड फुटांची. फांद्या अगदी जमिनीपासून लागलेल्या होत्या. फांद्यांची संख्या भरपूर, फांद्या कडक आणि सरळ आकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या अशा. पानांची जोडणी एकाड-एक (alternate) पद्धतीची, पाकळीच्या (Elliptic) किंवा काहीशी पात्यासारख्या (Linear) आकाराची. लांबी साधारणपणे ३ सेमी पर्यंत. पानांच्या कडा (Margin) एकसंध आणि पाने टोकाकडे टोकदार होत गेलेली. रंग भुरका-हिरवा, पानांची मागची बाजू तर आणखी भुरकी आणि मुलायम केसानी आच्छादलेली. गुलपंखीमधे पानांना फांदीशी जोडणारा दांडा (Leaf Stalk) नसतो, शास्रिय भाषेत अशा पानांना Sessile Leaf असं म्हणतात.

पान फांदीवर ज्या ठिकाणी जोडलं
गेलं आहे त्या अक्षातून (Axis) फुलोरा निघतो, साधारण दीड सेमी लांबीचा. ६-८ फुलं गर्दीने
या फुलोऱ्यावर लागलेली असतात. फुलोऱ्याच्या खालच्या भागातील फुलं आधी उमलतात आणि टोकाकडे
ती क्रमाक्रमाने उमलत जातात. असं क्रमाक्रमाने फुलल्यामुळे फळधारणेची शक्यता वाढते.
गुलपंखीच्या फुलांचा आकार अगदीच लहान, फार फार तर ६-८ मीमीचा. फुलामध्ये संरक्षण दलांची
(Calyx) संख्या पाच, त्यातली दोन वरच्या बाजूने लागतात, कान टवकारल्यासारखी आणि काहीशी
वक्राकार. निळसर-जांभळा किंवा लव्हेंडर रंग आणि मधोमध उभी हिरव्या रंगाची जाडशी आणि
ठळक हिरवी रेषा. या दोन रंगांचं वरच्या संरक्षण दलांवरील रेषांचं नक्षीकाम डोळ्यांत
भरणारं असतं. ही दोन्ही संरक्षण दलं मागच्या बाजूने पांढुरक्या मुलायम केसांनी भरलेली
असतात. खालच्या बाजूने तीन संरक्षण दलं लागतात. ती आकाराने वरच्या दलांच्या तुलनेत
लहान आणि मुलायम केसांनी भरलेली असतात. संरक्षण दलांच्या आत तीन पाकळ्याची रचना पाहायला
मिळते. त्यातल्या वरच्या बाजूने दोन तर खालच्या बाजूने एक पाकळी असते. सर्व पाकळ्या
निळसर जांभळ्या किंवा लव्हेंडर रंगाच्या असतात. यातील वरच्या दोन पाकळ्या आकाराने लहान
म्हणजे ३-४ मीमी लांबीच्या असतात. यांचा आकार उलट्या अंड्यासारखा (Obovate) असतो आणि
कुक्षीच्या (Ovary) जवळ त्या एकमेकांना जोडलेलया असतात. या दोन पाकळ्यांच्या खालोखाल
सोंडेसारखी, अर्धवक्राकार आणि वरच्या बाजूला तोंड असणारी पाकळी लागते. संपूर्ण फुल
एकत्र पाहिल्यावर एखाद्या पक्षाची छोटी प्रतिकृती असल्याचा भास ही संबंध रचना निर्माण
करते. या पाकळीच्या टोकाकडचा भाग मुलायम केसांमध्ये रूपांतरित झालेला असतो. लक्षपूर्वक
पाहिल्यास समजतं की या केसांचा बहुधा गुंता झालेला असतो. अर्थात हा गुंता उगाचच नाही!
तो प्रजननाच्या (Fertilization) प्रक्रियेसाठी मदत करणारा आहे. खालच्या बाजूने लागलेल्या
याच सोंडेमध्ये स्रिकेसर आणि पुंकेसर राहतात. फुलं परिपक्व झाली की त्यांचा आकर्षक
रंग आणि वेगळी रचना पाहून जशी माणसांना भुरळ पडते अगदी तशीच भुरळ कीटकांना, फुलपाखरांना
आणि पक्षांना देखील पडते. तोवर परागकण तयार होऊन पुंकेसरातून बाहेर आलेले असतात, नवनिर्मितीसाठी
सज्ज असतात! कीटकांच्या व फुलपाखरांच्या फुलांसोबत भेटी-गाठी सुरु होतात. या फुलावरून
त्या फुलावर बागडणं होतं. सोंडेतील मकरंद काढण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो. या सर्व
गोंधळात नकळत परागकण (Pollen Grains) कीटकांच्या सोंडेला, पायाला किंवा अंगावर चिकटतात
आणि हेच कीटक जेव्हा दुसऱ्या फुलांना भेट देतात त्यावेळी सोंडेच्या टोकाला असलेल्या
केसांच्या गुंत्यात पाय, पंख इत्यादी अडकतात व नकळत घासले जातात. याचीच परिणीती म्हणून
परागकण खाली स्रिकेसराच्या तोंडावर पडतात. आणि फलनाची (Feritilization) प्रक्रिया सुरु
होते.
गुलपंखीची फळं अगदी लहान, ४-५ मीमी लांबीची. फळाच्या
मधोमध अक्ष (Axis) असतो आणि त्या अक्षाभोवती दोन्ही बाजूला चौकोनाकृती पापुद्र्यासारखी
रचना असते. अक्षाच्या दोन्ही बाजूला एक-एक असे फळाचे दोन भाग पडतात, यातील प्रत्येक
भागात साधारण ४ मीमी लांबीची एक बी भरते. बीचा रंग काळा असून त्यावर मुलायम केस असतात,आकार
लंबगोलार असतो. फळामध्ये बिया जिथं जोडलेल्या असतात तिथे पांढऱ्या रंगाचा पदर पाहायला
मिळतो, बीचा १०% भाग याने वेढलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात.
बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या
आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत
पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात.गुलपंखीचा मात्र यामुळे स्वार्थ साधला जातो,
बीजप्रसाराचा आणि नवनिर्मितीचा!
मराठी नाव ‘गुलपंखी’ हे फुलांच्या रचनेविषयी सांगणारं
आहे. फुलांचा रंग लव्हेंडर किंवा काहीसा गुलाबी असतो आणि वरच्या बाजूने लागलेल्या संरक्षण
दलांचा आकार उडत्या पक्षाच्या पंखांसारखा भासतो म्हणून 'गुलपंखी' हे सूचक नाव आलेलं
असावं. गुलपंखीला इंग्रजीमध्ये Woolly-winged Milkwort या नावाने ओळखतात. या वनस्पती
गाय, शेळी वैगेरे दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या खाण्यात आल्यास त्यांच्या दूध वाढीमध्ये
फायदा होतो आणि म्हणून "Milkwort" या शब्दाचा उल्लेख इंग्रजी नावामध्ये दिसून
येतो. शास्रिय भाषेत गुलपंखीला Polygala erioptera R.Br.असं म्हणतात. यातील Polygala शब्द
ग्रीक भाषेतून आला असून त्याचाही संबंध गुरांच्या दुधवाढीशी आहे. erioptera शब्द पाकळ्यांच्या
संरक्षण दलांवरील केसांसंदर्भातील आहे. गुलपंखीच समावेश "Polygalaceae" या
कुळामध्ये झाला आहे.
माळरानांवरील या चिमुकल्या सौंदर्याची मजा लुटणं
खरंच अभूतपूर्व आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणं निव्वळ अशक्य
आहे. चला तर मग सौंदर्यदर्शनाला!
Plant Profile:
Botanical Name: Polygala
erioptera R.Br.
Synonyms: P.
Arabica, P. leptorhiza, P. linearis, P. multibracteata, P.
noucherensis, P. nubica, P. obtusata, P. oligantha, P. paniculata, P. paulayana,
P. retusa, P. schimperi, P. serpyllifolia, P. tomentosa, P. triflora
Common Name: Woolley-winged
Milkwort
Marathi Name: Gulpankhi (गुलपंखी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Grasslands
(डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Lavender,
Purple to Pink (लव्हेंडर किंवा गुलाबी)
Leaves: Simple,
Linear / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, sessile.
Smell: No
smell
Abundance: Common
Locality: Dattagad
(Dighi), Pune
Flowering Season: All Year
Date Captured: 26-Aug-2017
- रा.जा. डोंगरे
No comments:
Post a Comment